महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२०

🔴🔴 महत्वाची सूचना 🔴🔴

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२०

कर्जमुक्तीची यादी आज रोजी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गावात प्रसिद्ध झालेली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले सोबत

१. आधार कार्ड
२. बँकचे बचत खाते पासबुक
३. प्रसिद्ध केलेले यादीतील विशिष्ट क्रमांक
४. आधारसोबत संलग्न असलेला आपला मोबाईल क्रमांक

या गोष्टी सोबत घेऊन जवळपास असलेले कोणतेही आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई महासेवा केंद्र किंवा ए डी सी सी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे .

आपले आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यास आपल्या बँक खात्यात माफीची रक्कम जमा होणार आहे

हा संदेश सर्व गावातील सर्व ग्रुपवर प्रसारित करा जेणेकरून पात्र शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा फायदा होईल.

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२०

“महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019” असं नाव या योजनेस देण्यात आलं आहे.

कर्जमाफीचे निकष काय?

 • ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेतलं आहे आणि ते 30 सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, त्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ आहे.
 • ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेऊन त्याचं पुनर्गठन केलं आहे आणि ते 30 सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, त्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ आहे.
 • कर्जबाजारी शेतकऱ्याकडे किती जमीन आहे (अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक) याचा विचार केला जाणार नाही.
 • कुटुंब नव्हे तर वैयक्तिक शेतकरी हा एकक ग्राह्य धरण्यात आला आहे. प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल.
 • 30 सप्टेंबर 2019 रोजी शेतकऱ्यावरील कर्जाच्या थकबाकीची रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असल्यास त्याचं कर्ज माफ होणार नाही.
 • राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज माफ होईल.

या योजनेचा पुढील शेतकऱ्यांना लाभ होणार नाही…

 • राज्यातील आजी किंवा माजी मंत्री किंवा राज्यमंत्री, लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य
 • केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे.
 • केंद्र आणि राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी (महावितरण, एसटी महामंडळ आदी) ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
 • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती
 • निवृत्त व्यक्ती ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे
 • कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दूध संघ यांचे अधिकारी, ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे

बातमी :-

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली. (सन २०२०) :

एप्रिल अखेरपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.

 

कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद (सन २०२०) :
विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.

 
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले आणि हेरले या दोन गावातील नावांची यादी आज प्राथमिक टप्प्यावर जाहीर झाली आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत आसुर्ले इथं हे काम सुरु आहे.

अहमदनगर : 972 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ब्राह्मणी (ता. राहुरी) गावातील 856, तर जखणगाव (ता. नगर) मधील 116 शेतकऱ्यांची नावं या यादीत आहेत. नगर जिल्ह्यात 2 लाख 15 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती आहे.

उस्मानाबाद : तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावातील 312 शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी जाहीर केली आहे.

हिंगोली :  236 शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे. हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या गावांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट दिली.

कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

 
 

Leave a Comment